ग्रामपंचायत होडावडा

परिचय

ग्रामपंचायत होडावडा

          सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यामध्ये होडावडा ग्रामपंचायत येते. होडावडा गावाच्या परिचयासाठी काही प्रमुख माहिती खालीलप्रमाणे आहे: 

  • स्थान: होडावडा हे वेंगुर्ला तालुक्यात आहे, जे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक भाग आहे.
  • प्रशासकीय माहिती: होडावडा ग्रामपंचायत वेंगुर्ला पंचायत समिती आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येते.
  • आकर्षण: होडावडा ग्रामपंचायतीच्या प्रमुख आकर्षणांपैकी श्री देव क्षेत्रपालेश्वर मंदिर, श्री देवी सातेरी मंदिर, श्री सिध्दमहापुरुष मंदिर, श्री देव  चव्हाटा मंदिर आहे.
  • गावातील प्रमुख पिके: भात शेती, आंबा, काजू.
  • कर्मचारी: होडावडा ग्रामपंचायतीत एकूण १२ पूर्णवेळ सरकारी कर्मचारी कार्यरत आहेत.

होडावडा गावाची माहिती

होडावडा गावाच्या चारही बाजुला तुळस, वजराट, मातोंड, मठ, तळवडे ही गावे आहेत. होडावडा येथील श्री देव क्षेत्रपालेश्वर मंदिर, श्री देवी सातेरी मंदिर, श्री सिध्दमहापुरुष मंदिर, श्री देव  चव्हाटा मंदिर हि मंदिरे प्रसिध्द आहेत.

गावात लोकांच्या प्रवासाची सोय म्हणुन एस.टी.ची सोय आहे. होडावडा गावापासुन ०८ कि.मी वर सावंतवाडी रेल्‍वे स्‍थानक आहे. तसेच ३९ कि.मी च्‍या अंतरावर मोपा आणि ४२ कि.मी च्‍या अंतरावर चिपी अशी आंतरष्‍ट्रयीय विमानतळे आहेत. गावातील माती लाल आहे. गावात दळणवळण, नळयोजना, सार्वजनिक व खाजगी विहिरी, दूरध्वनी, वीज, आरोग्य उपकेंद्र अशा पायाभुत सुविधा उपलब्ध आहेत.

हवामान उष्ण व दमट असून जून, जुलै, ऑगस्ट, व सप्टेंबर या महिन्यात पाऊस पडतो. गावातील एकुण क्षेत्रापैकी ८३५-२९-४४ हेक्टर ऐवढी शेत जमिन आहे. व २७८-४-७९ हेक्टर लागवडीला अयोग्य आहे. गावात १५२ लहान शेतकरी , ३९४ अल्पभुधारक व भुमीहीन शेतकरी आहेत. भात, आंबा, काजू हे प्रमुख पिक आहेत.

गावातील एकुण साक्षरतेचे प्रमाण १०० टक्के असून शाळा सोडलेल्या मुलांची संख्या ० आहे. गावात मराठा, भंडारी, देवळी, न्‍हावी आणि अनुसुचित जाती / जमातीचे लोक राहतात. त्यांचे आपापसातील संबंध सलोख्याचे आहेत. येथील लोकांची शेती, मोलमजुरी, व्यापार ही उत्पन्नांची साधने आहेत

ग्रामपंचायतीची रचना

ग्रामपंचायतीचे नाव :- ग्रामपंचायत होडावडा

0
महसूल गावे संख्या
सदस्य संख़्या
एकूण वाड्यांची संख़्या
एकूण लोकसंख़्या
एकूण पुरूष संख्या
एकूण स्त्री संख्या
एकूण घरांची संख्या
0
एकूण वॉर्ड संख्या
एकूण क्षेत्रफळ (हे.)

ग्रामपंचायत होडावडा

होडावडा ग्रामपंचायत ही वेंगुर्ला तालुक्यातील एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे, जी गावाच्या विकासासाठी आणि प्रशासनासाठी विविध विभाग व जबाबदाऱ्या पार पाडते.

संपर्क

ग्रामपंचायत कार्यालय होडावडा
गाव : होडावडा
तालुका : वेंगुर्ला
जिल्हा : सिंधुदुर्ग
संपर्क क्र. : (०२३६६) २२५०२९
ई-मेल : hodawda07@gmail.com

Scroll to Top